बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशियाच्या इशाऱ्याला अमेरिकेकडून केराची टोपली, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धाचा आज 63वा दिवस असून या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील परिस्थिती भयावह झाली आहे. त्यात युक्रेनला मदत न करण्याची तंबी रशियाने इतर देशांना दिली आहे. युक्रेनला कोणत्याही देशाने मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असं म्हणत रशियाने अणुयुद्धाचा (Nuclear War) इशारा दिला आहे.

रशियाच्या या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत अमेरिकेने (America) मोठा निर्णय घेतला आहे. रशियाच्या विरोधात लढण्यासाठी रशियाला अधिक प्राणघातक शस्त्रे पुरवण्याचा निर्णय अमेरिका व मित्र राष्ट्रांनी घेतला आहे. अमेरिका व त्यांच्या युरोपीयन मित्र राष्ट्रांनी युक्रेनला हॉवित्झर तोफा, ड्रोन, विमान विरोधी स्टिंगर आणि अँटी-टँक जेव्हलिन क्षेपणास्त्रे देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करत या युद्धाची सुरूवात केली. रशियाच्या या निर्णयानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर आज युद्धाच्या 63व्या दिवशी देखील रशियासोबतचा अमेरिका व पाश्चिमात्य देशातील ताण कमी झालेला नाही.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

“आज्जींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे, पण आमच्यासाठी नाही”

राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही, बाळा नांदगावकर म्हणतात…

बहुप्रतिक्षित KGF 3 कधी येणार?; रॉकी भाई म्हणाला…

“मला टाॅम अँड जेरी आवडतं, पण सध्या माकड उड्या बघतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More