बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेची सीरियामध्ये मोठी कारवाई! अल कायदाच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर

दमास्कस | काही दिवसांपूर्वी सीरियाच्या दक्षिणेकडील अमेरिकेच्या तळावर अल कायदाने हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेने प्रतिहल्ला केला आहे. या अल कायदाच्या वरिष्ठ कमांडरचा अमेरिकेने सीरियात ड्रोन हल्ल्यात खात्मा केला. याबाबतची माहिती पेटॉगॉनने दिली आहे. अल कायदाने हल्ला केल्याच्या दोनच दिवसांनी अमेरिकेने ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

दहशतवादी संघटनांविरोधात कारवाईसाठी या तळाचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. उत्तर सीरियामध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन कारवाईमध्ये अल कायदाचा अब्दूल हमिद अल मतार हा मारला गेला आहे. आता अमेरिकेने थेट कारवाई केल्याने आता अल कायदाच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय.

पेटॉगॉनच्या सेन्ट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी यांनी हा हल्ला केल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच या हल्ल्यात अल कायदाच्या कमांडरसह तिघेजण मारले गेल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अल कायदाच्या हल्ल्याला उत्तर दिल्यानं दहशदवादी संघटना सतर्क झाल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटना यांच्यात छुपं युद्ध होताना दिसत आहे. त्यामुळे आता अमेरिकेेने यंत्रण्याणाच्या सहाय्याने हा हल्ला घडवून आणला आहे.

थोडक्यात बातम्या –

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

“आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरूष, बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाही”

‘…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले’; पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

“महाराष्ट्र तुळशीचे वृंदावन आहे, इथं गांज्या आणि भांग पिकवू नका”

“एक मंत्री सकाळ संध्याकाळ कुठली तरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More