बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या सागरी सीमेत अमेरिकन नौदलाची घुसखोरी; भारत-अमेरिकेतील संबंधांवर परिणाम?

नवी दिल्ली | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या काळात भारत आणि अमेरिका या दोन देशातील संबंध चांगलेच सुधारले होते. अमेरिकेत दोन महिन्यापुर्वी सत्ताबदल झाला आणि जो बायडन यांंनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही देशांनी चांगले ठेवण्याचे प्रयत्न केले. परंतू आता दोन देशातील संबंध दुरावताना दिसत आहे.

कुठलीही परवानगी न घेतला लक्षद्वीपजवळ अमेरिकन नौदलाच्या 7 फ्लीटकडून सुरू असलेल्या सरावाच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेकडे चिंता व्यक्त केली आहे. कुठल्याही सहमतीशिवाय अशा प्रकारचा सराव भारताच्या सागरी सुरक्षा धोरणाची अवहेलना आहे, असं भारताने स्पष्ट केलं आहे.

एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये घुसून युद्ध सराव करण्याचा कुठल्याही देशाला अधिकार नाही. विशेष करून ज्या सरावात स्फोटकं आणि शस्त्रांचा समावेश असेल, असं परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. परंतू संयुक्त राष्ट्रांच्या सागरी सुरक्षा कायद्यानुसार भारताने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

लक्षद्वीपपासून १३० नॉटिकल मैल पश्चिमेस भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या आत नेव्हीगेशनल राइट्स आणि फ्रीडमचा उपयोग केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत भारताची परवानगीची गरज नाही, असं जॉन पॉलने म्हटलं होतं. पण एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या आत युद्ध सराव किंवा वाहतुकीसाठी पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे, असं भारताने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबिजची लस, ‘या’ ठिकाणच्या घटनेमुळं एकच खळबळ

अखेर पुण्यावर केंद्राची कृपादृष्टी, कोरोना लसीचे 3 लाख 73 हजार डोस मिळणार

राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून ‘या’ नियमात बदल

भिडे गुरुजींनी सरसंघचालक मोहन भागवतांना अपशब्द वापरले का?; संजय राऊतांच्या फॅनपेजवरुन सवाल

“…त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More