Top News

मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क | भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर मध्यस्थी करण्याच्या आपल्या प्रस्तावाचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्याशी मी बोललो. चीनसोबतच्या संघर्षामुळे ते सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

भारत आणि चीन त्यांचा मोठा संघर्ष आहे. प्रत्येकी 1.4 अब्ज लोकसंख्या असलेले दोन देश. अतिशय शक्तिशाली सैन्यदल. भारत खुश नाही आणि बहुधा चीन समाधानी नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

आम्ही भारत आणि चीन या दोन्ही देशांना याबाबत कळवलं आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत म्हटलं होतं. पण भारत आणि चीन शांततापूर्ण मार्गाने या मुद्द्यावर उत्तर शोधेल. आम्ही चीनशी चर्चा करत आहोत, अशी भूमिका भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली होती.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. तेव्हाही भारताने काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत यात मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”

संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार

राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या