बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राॅ’ मटेरियलसाठी अजित डोवाल मैदानात; लसीसाठी लागणारा कच्च्या माल पुरवण्यास अमेरिका तयार

नवी दिल्ली | केंद्र सरकारने देशभरात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक यांच्या दोन लसी सध्या भारतात देण्यात येत आहेत. पण आता लसीकरणात लोकांचा सहभाग वाढल्याने लसची मागणी भारतात वाढत आहे. पण लस तयार करण्यास लागणारा कच्चा माल भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे भारताने अमेरिकेकडे कच्चा माल देण्याची विनंती केली होती. परंतू अमेरिकेने कच्चा माल देण्यास नकार दिला. त्यानंतर भारताचे माजी राॅ अधिकारी आणि एनएसए प्रमुख अजित डोवाल मैदानात उतरले आहेत.

भारतीय एनएसए प्रमुख अजित डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसए प्रमुख जॅके सुलीवॉन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर अमेरिकेकडून लसीसाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरवण्यासाठी अमेरिकेने तयारी दर्शवली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे आता भारतातील लसीकरणाला वेग मिळणार आहे.

अजित डोवाल आणि जॅके सुलीवॉन यांच्यात झालेल्या नव्या निर्णयानुसार अमेरिकेने भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या आरोग्य खात्याचं तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत भारतातील कोरोना कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार असल्याचं सागितलं जातंय.

दरम्यान, याआधी भारतातील लस वितरण कंपनी सीरम इंस्टिट्युडने अमेरिकेकडे लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मागणी केली होती. सीरमच्या मागणीनंतरही कोरोना लसीच्या कच्च्या माल देण्यास अमेरिकेने नकार दिला होता.

थोडक्यात बातम्या-

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 21 दिवसात रुग्णसंख्या निम्यावर

फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीसाठी सलमान सरसावला; खाद्यपदार्थांची चव चाखत घेतला मदतकार्याचा आढावा

तारापुरात वायु गळती झाल्याची शक्यता; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

…तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन- दत्तात्रय भरणे

“शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More