बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना’; लसीसाठी लागणारा कच्चा माल न देण्यावर अमेरिका ठाम

वॉशिंग्टन | अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती याआधी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली होती. मात्र अमेरिकेनं निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल न देण्यावर अमेरिका ठाम असल्याचं दिसतंय. यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे. मात्र कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने या मोहिमेला धक्का बसला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकजूट व्हायचं असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवा, असं पुनावाला म्हणाले होते. मात्र अमेरिकेनं निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना आहे. आमचे नागरिक ही आमची जबाबदारी आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशात गेल्या तीन दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

 थोडक्यात बातम्या- 

सुजय विखेंचा गनिमी कावा, स्पेशल विमानानं दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर आणली!

‘आजारातून बरा झाल्यावर एक झाड लाव’; सोशल मीडियावर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल

अनिल देशमुख यांच्यावर धाड, ‘दया कुछ तो गडबड हैं’ म्हणत राऊतांकडून शंकेची वावटळ!

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More