अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा दणका, दहशतवाद्यांना बळ न देण्याचे आवाहन

वाॅशिंग्टन | अमेरिकेनं पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना आश्रय न देण्याचे आवाहन अमेरिकेनं केलं असून वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताच्या ताब्यात देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचे स्वागतदेखील अमेरिकेनं केलं आहे.

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळ ठरावांचे पालन करून दहशतवाद्यांना आश्रय देणे टाळावे व त्यांच्या आर्थिक नाड्या आवळाव्यात, असे अमेरिकेनं सांगितलं आहे. 

भारत व पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावावाबाबत अमेरिकी प्रतिनिधी गृहाचे नेते स्टेनी होयर यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाची सुटका करण्याच्या पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयाचे चीननेदेखील स्वागत केले.

महत्वाच्या बातम्या-

-अभिनंदन वर्धमान मायभूमीत परतण्यामागे नरेंद्र मोदींचं श्रेय- स्मृती इराणी

-“मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस, देशाची सेवा हेच माझे कर्तव्य”

-“मोदींच्या जागी दुसरा पंतप्रधान असता तर त्यांनीही हेच केले असते!”

-जबरदस्ती व्हीडिओ रेकॉर्ड करायला लावल्याने अभिनंदन यांना उशीर

-पोलीस पाटील आणि होमगार्ड यांच्या मानधनात मोठी वाढ