भारत-रशियाची वाढती जवळीक; अमेरिकेने भारताला दिला ‘हा’ गंभीर इशारा
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने अमेरिकेसह अनेक युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रशियाची चांगलीच कोंडी झाली आहे.
भारतानेही रशियासोबत (Russia) व्यवहार करू नये यासाठी अमेरिकेकडून (America) प्रयत्न केले जात आहे. रशिया आणि भारताची वाढती जवळीक बघता अमेरिकेने भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहेेेेेेेेेेेेेेेे. अमेरिकेने भारताला रशिया आणि चीनच्या (China) मैत्रीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंह यांनी भारताला सावध राहायला सांगितलं आहे. रशिया आणि चीनमध्ये घट्ट मैत्री असून दोन्ही देश मित्रराष्ट्र आहेत. जर चीनने एलओसीचं उल्लंघन केलं तर रशिया भारताच्या बाजूने उभा राहिल या भ्रमात राहू नये, असा अप्रत्यक्ष इशारा दलीप सिंह यांनी दिला आहे.
दरम्यान, सध्या चीन आणि रशिया जास्त जवळ असल्याचंही दलीप सिंह म्हणाले. तर भारताने रशियासोबत तेल किंवा इतर गोष्टींसंदर्भातील व्यवहार करायची घाई करू नये, असा सल्ला देखील सिंह यांनी दिला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी केललं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मोदी सरकार ‘ही’ पण कंपनी विकण्याच्या तयारीत
मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जारी, वाचा ताजे दर
“अटलजींच्या काळात लोकशाही पाहिली, आता हुकुमशाहीचा अनुभव घेतोय”
“मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी”
Comments are closed.