बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांसाठी धोक्याची घंटा! ‘तात्काळ ‘हा’ परिसर खाली करा’; अमेरिकेचा नागरिकांना इशारा

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्याठिकाणी परिस्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. शनिवारी प्रार्थना सभेच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये जवळपास 100 अफगाण नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून काबूलमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. अशातच आता अमेरिकेने काबूलमधील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

काबूलमधील नागरिकांनी सरेना हॉटेलच्या जवळच्या परिसरातील लोकांनी त्वरित त्या ठिकाणांहून बाहेर पडावे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. काबूलमधील अलिशान हॉटेलपैकी सरेना हॉटेलला परदेशी नागरिकांची सर्वात जास्त पसंती असते. त्यामुळे त्याठिकाणी परदेशी नागरिक जास्त करून मुक्कामास थांबतात. अफगाणिस्तानमधील दहशतवाद्या कारवाया बघता अमेरिकेने परदेशी नागरिकांना सावध केलं आहे.

अमेरिका आणि ब्रिटनने नागरिकांना दिलेला इशाऱ्यामागे जगभरातून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र अजूनही या इशारा देण्यामागील कारण समोर आलं नाही. अलिकडेच अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिमांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी मशिदीवर बॉम्बस्फोट केला होता. त्यामुळे अमेरिकेकडून देण्यात आलेला इशारा हा तेथील नागरिकांना धोक्याची घंटी असणारा आहे.

दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी अनेक दहशतवाद्या कारवाया झाल्या आहेत. काही कारवायांची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये येत्या काही काळात घडणाऱ्या घटनांकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या –

रकुल प्रीत सिंह करतीये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भन्नाट ऑफर! लस घेतली तर मिळणार ‘या’ गोष्टी मोफत

अजब! ‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’, चोरीनंतर चोराने लिहीलेल्या चिठ्ठीचीच सर्वत्र चर्चा

‘ही’ सरकारी कंपनी वाटणार मोफत सिमकार्ड; वाचा सविस्तर

“हे तर मुलांचं राज्य आहे, मुलींचा सन्मान यांची संस्कृती नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More