पुतिन यांना जोर का झटका! अमेरिकेसह जी-7 देशांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर अमेरिका (USA) व मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादायला सुरूवात केली.
अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असले तरी अमेरिका व जी-7 देश कच्चे तेल आणि गॅससाठी रशियावर अवलंबून असल्याने याबाबत कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांना झटका देत अमेरिका व जी-7 देशांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिका व विकसित देशांच्या जी-7 संघटनेने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाकडून तातडीने तेल खरेदी बंद केली जाणार नसून टप्प्या टप्प्याने ही खरेदी कमी केली जाणार आहे. जी-7 मधील अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली आणि जपान हे सर्वच देश रशियाच्या कच्च्या तेलाचे उपभोक्ते आहेत.
दरम्यान, पुतिन यांचे मुख्य साधन नष्ट होईल आणि युद्ध लढण्यासाठी निधी संपेल, असं मत जी-7 देशांनी या निर्णयावरून व्यक्त केलं. 9 मे रोजी रशिया त्यांचा विजय दिवस साजरा करतो. रशियाच्या विजय दिवसाच्या आधी हा निर्णय घेत जी-7 देशांनी रशियाला मोठा धक्का दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! नवनीत राणांचा जामीन रद्द होणार?
कच्च्या तेलाच्या दरात वाढ, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
IPS कृष्णप्रकाश यांची संपत्ती आली समोर, वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे
“…तर मी 14 दिवसच काय, 14 वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार”
“मी उद्धव ठाकरेंन आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर…”
Comments are closed.