बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंदोलन राणेंविरुद्ध… गाढव, मांजर, कोंबड्यांचे मात्र प्रचंड हाल!

पुणे | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. राणेंना अटकही झाली होती, मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. तत्पूर्वी राणेंच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं झालेली पहायला मिळाली, पण या साऱ्यांमध्ये प्राण्यांचे मात्र प्रचंड हाल झाल्याचं पहायला मिळालं.

गाढव, मांजर आणि कोंबड्यांचा या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर झाला. पुण्यात झालेल्या आंदोलनामध्ये कोंबड्यांचे पाय प्लॅस्टिकच्या पिशवीनं बांधून ठेवले होते, तर मुंबईच्या बोरीवलीमध्ये झालेल्या आंदोलनात कोंबड्यांना काठ्यांना बांधून लटकवण्यात आलं होतं. कोंबड्या भिरकावून देण्याचे प्रकारही काही भागात दिसून आले.

पुण्याच्या डेक्कन परिसरात काल सकाळी झालेल्या एका आंदोलनात मांजराचा वापर करण्यात आला. या आंदोलनात मांजराच्या पिल्लाला जबरदस्तीने दूध प्यायला लावलं जात होतं. तिथं सुरु असलेल्या गोंधळामुळे मांजरीचं पिल्लू चांगलंच भेदरलेलं दिसलं, मात्र कार्यकर्त्यांना त्याची चिंता नव्हती. नेत्याची उपमा दिल्यामुळे या मांजराचा हवा तसा वापर सुरु होता.

पुण्यात तसेच राज्याच्या विविध भागात झालेल्या आंदोलनांमध्ये गाढवांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात दिसून आला. यातील काही आंदोलनांमध्ये गाढवांच्या चेहऱ्यावर नेत्याच्या चेहऱ्याच्या कटआऊट लावण्यात आले होते. पोस्टर डोळ्यांपुढे असल्यानं गाढवांना नीट दिसतही नव्हतं, अशा परिस्थितीत गळ्यात दोरी बांधून त्यांना हवं तसं खेचलं जात होतं. कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा आणि आक्रमकपणाचा गाढवांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

थोडक्यात बातम्या-

भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, संजय राऊत राणेंना अग्रलेखात काय काय म्हणाले?

कोर्टात घडली महत्त्वाची घटना, फक्त ‘या’ एका कारणामुळे राणेंना जामीन मिळाला?

न्यायालयाने नारायण राणेंना जामीन मंजूर केला, मात्र ‘या’ अटी देखील घातल्या!

जामिनावर सुटताच नारायण राणेंचं पहिलं ट्विट, म्हणाले,

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासंदर्भात जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More