सारखा राग येतोय?; ‘या’ टिप्सनी करा कमी

नवी दिल्ली | राग (Anger) माणसाचा सगळयात मोठा शत्रू समजला जातो. अनेकदा या रागाचे गंभीर परिणाम पहायला मिळतात. यामुळं रागावलेल्या व्यक्तीचं नुकसान होत मात्र अनेकदा नातेसंबध देखील तुटू शकतात. अतीरागामुळे शरीरावर विपरित परिणामदेखील होतात. त्यामुळे या टिप्स वापरुन तुम्ही तुमचा राग नियंत्रणात आणू शकता.

रागात आपण अगदी नको त्या गोष्टी बोलून जातो. त्यामुळे राग आल्यानंतर बोलण्यापेक्षा शांत (Calm) राहण्याचा पर्याय अतिशय योग्य आहे. तुम्ही काही बोला नाही तर वाद वाढणार नाही त्यामुळे प्रकरण तिथेच थांबेल. तसेच चुकीचे शब्द टाळले जातील ज्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. त्यामुळे राग आल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा.

ज्या गोष्टीमुळं राग येत आहे तिथून लवकरात लवकर बाहेर पडा. त्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नका. यामुळे तुमचा राग थोडा शांत होईल. बाग,टेरेस अशा ठिकाणी एकांतात फिरुन या चक्कर मारा (walk around). जागा बदलल्यानं मन शांत होण्यास मदत होते. मोकळ्या ठिकाणी गेल्यावर दिर्घ श्वास घ्या आणि आपला राग शांत करा.

लहानपणापासून राग आल्यानंतरचा सांगण्यात येत असलेला हा जुना पर्याय आहे. जो प्रभावी देखील आहे. राग आल्यास अंक मोजायला सुरुवात करा. हे अकं उलट्या पद्धतीने म्हणा. 100 पासून 1 या अंकापर्यंत कांउट डाउन(Count down) करायला सुरु करा म्हणजे मन विचलित होईल आणि राग शांत होईल.

रागाच्या भरात अनेकदा लोक नको ते पाऊल उचलतात. नको ते बोलतात. वस्तू वैगरे तोडतात. हे सगळं नुकसान थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे अशावेळी तुमच्या आवडती गाणी (Songs) ऐकण्याचा पर्याय चांगला आहे. कानात इअरबडस घालून बाहेर फिरायला निघून जा. मन शांत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-