शेतकऱ्यांनो स्मार्ट शेती करण्यासाठी हे 3 सोलर उपकरणे वापरा; खर्च होईल कमी

Farmer l आजकाल शेतकरी आधुनिक शेती करण्यावर जास्त भर देतात. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. मात्र शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी अशी काही उपरकाने आवश्यक आहेत जे की त्यांचे काम अगदी सहजरित्या होऊ शकते. तर आज आपण अशी कोणते उपकरणे आहेत ते जाणून घेऊयात…

सौर पंप :

कोणत्याही जलपंपाचे काम हे पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे असते. तसेच सोलर वॉटर पंपचे कामही अगदी तसेच आहे. कारण तो सोलर वॉटर पंप आहे. त्याला चालण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी त्याचा वापर सिंचन पंप, घरगुती पंप, बागायती शेतीसाठी करतात.

सौर पाण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. पहिला सोलर सबमर्सिबल पंप. हा पंप आपल्या देशात सर्वात जास्त वापरला जातो. हा सबमर्सिबल पंप जमिनीच्या आत राहून वरच्या दिशेने पाणी पाठवतो. तसेच सोलर सबमर्सिबल पंप जास्त खोलीतून पाणी काढण्यासाठी वापरला जातो.

Farmer l आधुनिक शेतीसाठी हे उपकरणे वापरा :

सोलर ड्रायर :

आजकाल शेतकरी आधुनिक शेती करण्याला जास्त भर देतात. त्यामुळे शेतात फळबागा, भाजीपाला व मसाल्यांची लागवड करतात. मात्र शेतकऱ्यांना अनेक चांगल्या उत्पादन मिळून देखील बाजारात रास्त भाव मिळत नसल्याने अगदी मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे उत्पादनांमधील ओलावा. शेतातील फळे, भाजीपाला व मसाल्यांमध्ये जास्त ओलावा असल्याने पिके मोठ्या प्रमाणात खराब होतात. यामध्ये प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, हळद, आले, फळे, भाजीपाला व मसाला पिके खराब होतात. त्यामुळे शेतकरीवर्ग पिकांमधील ओलावा कमी करण्यासाठी पिके वाळवले जातात, जेणेकरून ते बरेच दिवस सुरक्षित देखील ठेवता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलर ड्रायर या तंत्राचा वापर कारने फायदेशीर ठरू शकते. जेणेकरून धान्य बाजारात पाठवण्यापूर्वी ते वाळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

सोलर इन्सेक्ट ट्रैप :

सोलर इन्सेक्ट ट्रैप म्हणजेच सौर कीटक सापळा बनवण्यासाठी सौर प्लेट आणि सौर चार्जेबल बॅटरी वापरली जाते, त्यानंतर कीटकांना आकर्षित करण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट एलईडी दिवा लागतो आणि त्यानंतर या तीन गोष्टी जोडून तयार केल्या जातात. इको फ्रेंडली सौर कीटक सापळा, जो कोणत्याही प्रकारच्या हानिकारक कीटकांना स्वतःकडे आकर्षित करून मारण्यास सक्षम आहे. हे सौर सापळे रात्र पडताच आपोआप चालू होतात आणि 5 ते 6 तास सतत चालतात.

News Title –Use these tools for modern agriculture

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांनो बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा!

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला यलो अलर्ट; तर इतर जिल्ह्यात कसे असणार वातावरण

ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…

महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा

…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण