बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स; पुण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे | राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स केल्याने पुण्यातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर सहा जण वारंवार अश्लील कमेंट्स करत होते. चाकणकर यांनी ट्विटरवर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ट्वीट केलं होतं. या टीकेचा राग मनात धरुन सहा जण रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शेरेबाजी करत असल्याचा आरोप आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला असून तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोना’च्या संकटकाळात प्रत्येक जण आपापल्या परीने एकमेकांची मदत करत आहे. रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीची माहिती ट्विटरवर देत आहेत

ट्रेंडिंग बातम्या-

“पालघर प्रकरणी 8 तासांत 101 आरोपी ताब्यात, त्यात एकही मुस्लिम नाही, जातीचं राजकारण करू नका”

मंत्री जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल

महत्वाच्या बातम्या-

आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More