#MeToo | …तेव्हाच कानशिलात का लगावली नाही?; पीडित तरुणींना उषा नाडकर्णींचा सवाल

#MeToo | …तेव्हाच कानशिलात का लगावली नाही?; पीडित तरुणींना उषा नाडकर्णींचा सवाल

मुंबई | #MeToo मोहिमेवर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी संताप व्यक्त केलाय. तरुणींनी अशा गोष्टी सहन करु नयेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

ज्या तरुणी आज आरोप करत आहेत त्या तेव्हा का बोलल्या नाहीत? कुणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हाच त्याच्या कानशिलात का लगावली नाही?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

पोरीपण आजकाल तयारीनं येतात. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही तसंच मी #MeToo मोहिमेच्या विरोधात नाही, असं उषा नाडकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, नाना पाटेकर यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा मात्र उषा नाडकर्णी यांनी बोलण्यास नकार दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईत ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला

-…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही!

-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी

-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी

Google+ Linkedin