बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला मारलंय”

मुंबई | गेल्या वर्षी 14 जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह वांद्रे येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचे वडील, बहिणी यांचे जबाब नोंदवले हाेते. सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. दरम्यान ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप करण्यात आला.

वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. अशात उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. त्यानंतर मालिकांमधून तो सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, असं उषा नाडकर्णी यांनी म्हटलं आहे.

मला खात्री वाटते की त्याला मारलं गेलं असेल, असं थेट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. सुशांत गेल्याची बातमी आल्यानंतर उषा नाडकर्णी यांना मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, गेल्यावर्षी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसांत धाव घेतली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आणि ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा सामना रंगला होता.

थोडक्यात बातम्या- 

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पहिल्या टप्यात ‘या’ किल्ल्यांचा समावेश

“राजकारणात पैसाच बोलतोय मात्र शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष”

‘या’ जिल्ह्यातील तळीरामांसाठी खुशखबर; मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार

“…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More