काॅफीचा ‘असा’ वापर केल्यानं तुमची त्वचा होईल एकदम चमकदार

मुंबई | आपण सुंदर दिसावं असं कोणला नाही वाटत. प्रत्येकजण आपण सुंदर दिसावं यासाठी काहीतरी उपाय करत असतो. काहीजण तर बाजारातील अत्यंत महागड्या क्रीमचा(Face Creame) वापर करत असतात. परंतु कधीकधी त्याचाही काही उपयोग होत नाही.

परंतु आपण घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करूनही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. प्रत्येकाच्या घरात काॅफी(Coffe) तर असतेच. या काॅफीत असणाऱ्या अॅंटी एजिंग गुणधर्मामुळं आपण काॅफीचा वापर करून त्वचेची काळजी घेऊ शकतो.

चेहऱ्यावर काॅफीचा वापर केल्यानं चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जातात. तसेच काॅफीमुळं चेहऱ्यावरील डेड स्कीनही निघून जाऊ शकते. काॅफीचा वापर चेहऱ्यावर केल्यास चेहऱ्यावर तेज येते.

यासाठी काॅफीचा समावेश असणारा फेसपॅक कसा बनवावा याची माहिती घेऊयात. एका वाटीत एक चमचा काॅफी पावडर घ्या. त्यात एक चमचा लिंबाच रस तसेच एक चमचा मध टाका. यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन चमचे दुधही घाला. आता या सर्वाची पेस्ट तयार करा.

आता चेहरा आणि मान स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर ही पेस्ट लावा. यानंतर थोडं सुकल्यानंतर चेहऱ्यावर-मानवर हलक्या हातानं दहा मिनिटं मसाज करा. मसाज झाल्यानंतर चेहरा धुवून घ्या आणि नंतर उरलेली पेस्ट फेस पॅक(Face Pack) म्हणून चेहऱ्यावर लावा. नंतर पंधरा मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

दरम्यान, काॅफी थेट चेहऱ्यावर लावल्याचेही अनेक फायदे आहेत. काॅफी चेहऱ्यावर लावल्यानं उन्हामुळं आलेले स्पाॅटही कमी होऊ शकतात. तसेच लाल-काळे चट्टेही कमी होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More