बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार

हैद्राबाद | आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एक अजब घटना  घडली आहे. एलरू कालव्या जवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासुन गाढवाचे अवशेष आढळुन येत आहेत. आंध्रप्रदेशमधील कृष्णा, प्रकाशसम व गुंटूर या जिल्ह्यातील लोकांमध्ये एक चर्चा पेटली आहे कि, गाढवाचं मटन खाल्याने लैंगिक क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

भारतात सध्या गाढवांची संख्या कमी होत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. आंध्रच्या बाजारात सध्या गाढवाचे मटन 600 ते 700 रूपये किलो मिळत आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार गाढव हा खाद्य प्राणी म्हणुन नोंदणीकृत नाही. त्यामुळे भारतात गाढवांची कत्तल करून ते खाणे बेकायदेशिर आहे.

प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यानी सांगितले की, आंध्रप्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये गैरसमज पसरला आहे की गाढवाचं मटन खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पण त्याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा पुरावा नाही. त्यामुळे होत असलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे.

गाढव खरेदी करण्यासाठी आता मांस विक्रेत्यांनी 15 ते 20 हजार देण्याचीही तयारी दाखवली आहे. भारतात गेल्या 7 वर्षात गाढवांच्या संख्येत 60 टक्के घट झाली असून एकट्या आंध्रप्रदेशात 2019 ची गाढवांची संख्या ही 5000 एवढी झाली आहे. त्यामुळे या चुकीच्या गोष्टींना बळी न पडता लोकांनी अशा गोष्टींना महत्व न देण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

गजा मारणेनंतर पोलिसांची नजर आता पुण्यातील ‘या’ खतरनाक टोळीवर!

आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना राजेश टोपेंनी दिला हा कानमंत्र; म्हणाले…

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More