देश

दुचाकीवरून प्रवास करताना लोकल ब्रँडचे हेल्मेट वापरल्यास होणार दंड!

नवी दिल्ली | दुचाकीस्वारांनी ब्रँडेड हेल्मेट वापरावेत, तसेच या हेल्मेटचे उत्पादन आणि विक्रीबाबतचा नवा कायदा लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकली आहेत. नव्या नियमानुसार लोकल हेल्मेट घालून दुचाकी चालवताना सापडल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.

लोकल हेल्मेट च्या उत्पादनावर दोन लाखांपर्यंतचा दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीस्वारांना सुरक्षित हेल्मेट पुरवण्यासाठी प्रथमच भारतीय सुरक्षा मानक ब्युरोच्या सुचीत समाविष्ट केले आहे. या अंतर्गत मंत्रालयाने 30 जुलैपर्यंत जारी केलेल्या अध्यादेशामध्ये संबंधितांकडून सल्ले आणि हरकती मागवल्या आहेत. आता 30 दिवसांनंतर याबाबतचा नवा नियम लागू केला जाईल.

विना हेल्मेट किंवा लोकल हेल्मेट प्रवास करताना आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नव्या मापदंडांनुसार हेल्मेटचे वजन दीड किलोवरू घटवून एक किलो 200 ग्रॅम करण्यात आले आहे.

गैर बीआयएस मानांकित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री हा गुन्हा मानला जाईल. असे करणाऱ्या कंपनीला दोन लाखांपर्यंत दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. तसेच अशा लोकल हेल्मेटची आता निर्यात करता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड- अशोक गेहलोत

वाढदिवस विशेष: तापसी पन्नूचा अभियंता ते बॉलिवूडचा प्रवास वाचून तुम्ही थक्क व्हाल….!

या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती?, उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर

“सरकार मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे… मंत्री जणू झपाटलेल्या सिनेमातील कलाकार”

“सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या