‘इतका’ वेळ मोबाईलचा वापर करत असाल तर आताच व्हा सावध, अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आयुष्यातील मूलभूत गोष्टी मानल्या जातात. यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ही गोष्ट म्हणजे 24 तास आपल्या हातात असणारा मोबाईल(Mobile) होय. मोबाईल हातात नसला की आपल्याला चैन पडत नाही. या मोबाईलचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेदेखील आहेत.

नियमित आणि सातत्याने मोबाईलचा वापर केल्यानं एका महिलेला तिचे डोळे गमवावे लागले. ही घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळेच डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार दिवसातून एका निश्चित वेळेतच मोबाईल वापरावा. दिवसभरात अर्थात संपूर्ण 24 तासात दीड तासापेक्षा जास्त मोबाईलचा उपयोग आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) ठरु शकतो.

दीड तासापेक्षा जास्त मोबाईल वापरल्यास शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सातत्याने मोबाईलचा वापर केल्यानं कोरड्या डोळ्यांची(Dry eyes) समस्या उद्भवू शकते. फोन मधून निघणारे किरण आपल्या डोळ्यांना हानी पोहचवतात. डोळे दुखणे, डोळे लाल होणे असा त्रास व्हायला लागतो.

काही ऑर्थोपेडिक डाॅक्टरांच्या (Orthopedic Doctor) मते, सतत फोन वापरल्यानं संधिवात (Arthritis) उद्भवण्याचा धोका वाढतो. याचं कारण म्हणजे लोक खूप वेळ फोन हातात धरात यामुळे हाताचे कोपर आणि मनगट दुखायला लागतात. हे दुखणे कायम राहिल्यास संधिवात होण्याची शक्यता असते.

या सगळ्या समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसत असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. वेळ जात नाही या कारणाने तासंतास फोन वापरल्यामुळे मानसिक त्रासदेखील (mental distress) होण्याची भिती असते. असं निरीक्षण मानोसपचार तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. रात्री अखंड फोन वापरल्यानेदेखील झोपेचे पॅटर्न बिघडतो ज्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आजच सावध व्हा आणि मोबाईलचा वापर कमी करा.

महत्त्वाच्या बातम्या