समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

हैदराबाद | तेलंगणात निवडणूक जशी जवळ येत आहे तसे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात वेगवेगळे हातखंडे वापरताना दिसत आहेत. तेलंगणात निवडणूक जिंकण्यासाठी आता चक्क घुबडांचा वापर सुरु झाला आहे.

तेलंगणा पोलिसांनी घुबडांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केल्यावर आलेली माहिती ऐकून पोलीसही चकीत झाले आहेत.

तस्करी केलेल्या घुबडांचा वापर समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी केला जाणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, घुबडांमुळे लोकांचे वशीकरण केले जाते, अशी अंधश्रद्धा असल्याने हा प्रकार सुरू आहे. घुबडांची किंमत 3 ते 4 लाख रुपयापर्यंत ठरली होती.

महत्वाच्या बातम्या-

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल

-राजस्थान जिंकण्यासाठी घाम गाळत आहेत आदित्य ठाकरे!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी वाजवला ‘युतीचा नगारा’?