उस्मानाबाद | शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पर्यावरण दिनाचं औचित्य साधत एक स्तुत्य उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांएवढी झाडं लावायचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यामुळे इतर खासदारांनीही त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही.
आपल्या फेसबुकवरून ओमराजे निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे. ओमराजे निंबाळकरांना 6 लाख मतं मिळाली आहेत. मिळालेल्या मतांएवढी म्हणजे 6 लाख झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेहमीच निसर्गाचा मार या जिल्ह्याला सहन करावा लागतो आहे. त्यासाठी इथल्या भागात जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. आपण सर्वांनी मिळून हे शिवधनुष्य उचलायचे आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
“मुख्यमंत्रीसाहेब… जनाची नाही मनाची लाज ठेऊन तरी मेहतांचा राजीनामा घ्या”
-…म्हणून राष्ट्रवादीच्या महिलांनी राम कदमांना दिला साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर!
-विखेंचा भाजपप्रवेश मुख्यमंत्र्यांनी ठेवला वेटिंगवरच; म्हणतात…
-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, भारतातील हवा आणि पाणी चांगलं नाही…
-RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी; त्यांच्याकडून काहीतरी शिका- शरद पवार
Comments are closed.