उस्मानाबाद | कोरोना विषाणूविरोधातला लढा हा अधिकच तीव्र झाला आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत गांभीर्य नसलेली लोकं बिना कामाची घराबाहेर पडत आहे. अशा कायदा मोडणाऱ्या लोकांविरोधात उस्मानाबाद पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.
मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात बसणार नाही अशा आशयाचे पोस्टर्स त्यांनी संबंधित बाहेर फिरणाऱ्यांच्या हातात दिले आहेत. कमीत कमी असं केल्यावर तरी लोक घराबाहेर पडणार नाहीत, असा मानस ठेऊन ही मोहिम पोलिसांनी सुरू केली आहे.
प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत हेच वाढणाऱ्या गर्दीतून अधोरेकित होत आहे. तेव्हा घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यापेक्षा त्याअगोदरचं पाऊल म्हणून उस्मानाबाद पोलिसांनी ही मोहिम सुरू केली आहे. मात्र या मोहिमेनंतरही लोकांनी ऐकलं नाही तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांनी अनेक ठिकाणी काठ्यांचा प्रसाद दिला होता. पुणे, औरंगाबाद तसंच जालना या ठिकाणचे व्हीडिओही सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत. लोकांनी देखील पोलिसांच्या या कृत्यांचं समर्थन केलं आहे. ज्यांना समजूतदारपणाची भाषा समजत नाही त्यांना अशीच शिक्षा देणं गरजेचं असल्याचं मत लोक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार कराल तर जेलमध्ये टाकेन; अजित पवारांची धमकी
संकट दाराशी उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला बाहेर पडू नका- शरद पोंक्षे
“मोदीजी आता थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगू नका, लोकांना कसं जगवणार ते सांगा”
Comments are closed.