Sharad Pawar l आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी गावात महायुतीच्या नेत्यांची सभा पार पडली आहे. या सभेदरम्यान जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार टीका केली आहे. मात्र आता माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत :
असली बारकी- चिरकी 5 उंदीरं शरद पवार साहेब रोज नाश्त्याला खातात. तसेच त्याच्या मागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अशी बारीक उंदरे जाऊन तिथं शरद पवारसाहेबांवर टीका करतात. मात्र या बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने त्यांना काय फरक पडत नाही. कारण कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत.
तसेच पवार साहेब हे पवार साहेब आहेत. त्यांनी राज्यातील भल्याभल्यांना लोळवलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन हे सुरूच राहील असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
Sharad Pawar l पडळकरांनी शरद पवारांवर काय टीका केली? :
राज्यात धनगर समाज लोकशाही विरोधात वातावरण तयार केले. कारण 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. मात्र यावेळी मारकडवाडी मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
News Title : Uttam Jankar on Gopichand Padalkar and Sadabhau Khot
महत्वाच्या बातम्या –
100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…; पडळकरांची पवारांवर एकेरी टीका
तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं… राज कुंद्राबद्दल सर्वात मोठा खुलासा
‘..हा तर क्षत्रियांचा अपमान’; पुष्पा-2 च्या निर्मात्यांना थेट धमकी, नेमकं झालं काय?
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार
सोन्याची पुन्हा गरुड भरारी, ‘इतक्या’ रुपयांनी झाली दरवाढ