‘अजित पवारांनी गुरंढोरं सांभाळावीत’; ‘या’ नेत्याचा अजितदादांना खोचक सल्ला

Uttam Jankar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचे उमेदवार हे तुतारी चिन्हावर लढले आहेत. अजित पवार यांच्याकडे घड्याळ चिन्ह आणि पक्ष असूनही अपेक्षित यश त्यांना मिळालं नाही. बारामती लोकसभा मतदरासंघात पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून देता आलं नाही. तसेच रायगडची जागा वगळता अजितदादांना इतर कोणत्याच मतदारसंघत यश मिळवता आलं नाही. (Uttam Jankar)

रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी झाल्याचं दिसून आलं. मात्र इतर काही मतदारसंघात अजित पवार यांना पराभवाचा सामना कारावा लागला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा दावा अजितदादांनी केला होता. मात्र शिरूमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे विजयी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

“अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे होते”

तसेच आता याचपार्श्वभूमीवर सोलापूरचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. मात्र अजित पवार यांनी वेगळी वाट धरली, असं ते म्हणालेत.

अनिल देसाई तसेच संजय राऊत यांनी जेलवाऱ्या केल्या पंधरा दिवस जेलमध्ये होते. जेलमध्ये जात संघर्ष करून पुन्हा तुम्ही उभे राहा परंतु त्या माणासाने शेवटी गटारीचे पाणी प्यायलं, असं उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले आहेत.

“अजितदादांनी आता गुरेढोरे बघत शेती सांभाळावी”

तसेच त्यानंतर उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले की अजितदादांनी आता गुरेढोरे बघत शेती सांभाळावी. त्यांनी राजकारण सोडून द्यावे असा खोचक सल्ला उत्तम जानकर यांनी अजितदादांना दिला आहे. उत्तम जानकर यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

News Title – Uttam Jankar Slam To Ajit Pawar About After Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार-एकनाथ शिंदेंवर बूमरँग होणार?; मोठी माहिती समोर

“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”

निकालानंतर अजित पवार गप्पच; आमदारांची धाकधूक वाढली, मोठा निर्णय घेणार?

“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट

राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट