Top News

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

लखनऊ | उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी यांचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांनी याबाबत तसे संकेत दिले आहेत.

आज होणाऱ्या प्रियांकांच्या रोड शोपूर्वी उत्तर प्रदेशातील काही नेत्यांनी खासगीत अशी शक्यता व्यक्त केली आहे. प्रियांकांच्या स्वागताला सारं लखनऊ शहर त्यांच्या फोटोने आणि फ्लेक्सने सजून गेलं आहे.

प्रियांका गांधीचा राजकारणातला वावर पाहता त्या आतापर्यंत उत्तर प्रदेशातच जास्त सक्रिय दिसून आल्या आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश पूर्वच्या सरचिटणीस म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले

“मला बारामतीला बोलावता काय… मग येतोच मी”

-जो जातीचं नाव काढेन त्याला मी ठोकून काढेन- नितीन गडकरी

‘तो’ चालू सामन्यात आला आणि धोनीचे ‘बुट’ पुसून गेला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या