Uttar Pradesh Crime | उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याची (Farmer) हत्या त्याच्याच पत्नीने (Wife) प्रियकराच्या (Lover) मदतीने केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. हा प्रियकर दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा सख्खा भाचा (Nephew) आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक (Arrest) केली आहे.
अशी घडली घटना
ही घटना खैरगडच्या (Khairagarh) बैरणी (Bairani) गावातील आहे. मंगळवारी रात्री ४३ वर्षीय सतेंद्र कुमार (Satendra Kumar) यांची गळा दाबून हत्या (Murder) करण्यात आली. त्याची २३ वर्षीय पत्नी रोशनी (Roshni) आणि तिचा १९ वर्षीय भाचा गोविंद (Govind), जो अलीनगर कांजरा (Alinagar Kanjara) येथे राहतो, या दोघांनी मिळून ही हत्या केली. रोशनीने सतेंद्रचे पाय धरले आणि गोविंदने गळा दाबला. अनैतिक संबंधात (Illicit Relationship) अडथळा ठरत असल्याने सतेंद्रची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. (Uttar Pradesh Crime)
२० वर्षांचे वयाचे अंतर आणि अनैतिक संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतेंद्रचे वय पत्नीपेक्षा २० वर्षांनी जास्त होते, तर भाचा गोविंद हा रोशनीच्या वयाचा होता. या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मैत्री होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सतेंद्र घरी नसताना ते दोघे भेटत असत. एके दिवशी सतेंद्रला त्यांच्याबद्दल संशय आला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. यानंतर गोविंद आणि रोशनीने सतेंद्रला मारून लग्न करण्याचा निर्णय (Decision) घेतला.
हत्येचा कट आणि अंमलबजावणी
आरोपींना यापूर्वीही सतेंद्रची हत्या करायची होती, पण ते धाडस करू शकले नाहीत. मंगळवारी रात्री रोशनीने गोविंदला फोन केला. गोविंद हा टुंडला (Tundla) येथील एका महाविद्यालयात (College) नर्सिंगचा (Nursing) विद्यार्थी (Student) आहे. हत्या केल्यानंतर गोविंद रात्री ३ वाजता घराबाहेर पडला. वाहतुकीचे साधन (Transportation) न मिळाल्याने तो चार-पाच किलोमीटर चालत गेला. सकाळी ऑटोने (Auto) घरी पोहोचला. नंतर तो पुन्हा सतेंद्रच्या घरी आला आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. (Uttar Pradesh Crime)
Title : Uttar Pradesh Crime Husband murdered by wife and her nephew over illicit relationship
महत्वाच्या बातम्या-
आठव्या वेतन आयोगाला मंजुरी; अर्थव्यवस्थेवर नेमका काय होणार परिणाम?
“मी सैफ अली खान आहे, लवकर…”; ऑटो ड्रायव्हरने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहाणी
मित्रासोबत फिरताना पाहिलं आणि डोकं फिरलं, पुढे घडला भयंकर प्रकार
क्रिकेटर रिंकू सिंगनं उरकला साखरपुडा; होणारी बायको आहे खासदार
पुणेकरांनो आत्ताच व्हा सावध; पुण्यात बनावट नोटांचा सुळसुटाळ