बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार”

नवी दिल्ली | 2014 च्या लोकसभा विधानसभेत भाजपने एकहाती विजय मिळवत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. नरेंद्र मोदींची यानंतर दिवसेंदिवस समाजमाध्यांतून प्रतिमा वाढत गेली. त्यानंतर आलेल्या मोदी लाटेने 2019 च्याही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नरेंद्र मोदी सोशल मीडियावर कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक वेळा भाजप नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. उत्तर प्रदेशातील भाजप मंत्री उपेंद्र तिवारी यांंनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलचं चर्चेत आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रूपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत, असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतात चारचाकी चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज लागते. भारतातील 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नसते. तसेच केंद्र सरकारने देशातील लोकांना कोरोनावरील लसीकरण मोफत पुरवले आहेत. तसेच इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरामध्ये तुलना केली तर यामध्ये इंधनाचे दर फार कमी आहेत, असाही दावा देखील उपेंद्र तिवारी यांनी अलिकडे केला होता.

दरम्यान, नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेत आले आहेत, तेव्हा पासून त्यांनी परदेशी दौरे हे खुप केले आहेत. तसेच त्यांच्या प्रसिद्धीसाठी ते मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर विरोधी पक्ष करत आहे. नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस सध्या सोशल मीडियावर वाढताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More