तोंडाने बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला शौर्य पुरस्कार मिळणार?

मेरठ | गुन्हेगारांना इशारा देण्यासाठी तोंडाने ‘ठॉय ठॉय’ असा बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावरून या पोलिसांची खिल्ली उडवण्यात आली होती.

गुन्हेगारांचा पाठलाग करताना उपनिरीक्षक मनोज यांची बंदूक बंद पडली. यावेळी त्यांनी समयसूचकता दाखवली, असं उत्तर प्रदेश पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केली जाणार आहे.

‘माझे सहकारी उपनिरीक्षक यांनी एका हिरोसारखं काम केलं. पोलीस दल याकडे सकारात्मकपणे पाहतं, असं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं.

दरम्यान, बंदूक जाम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तोंडातून आवाज काढला,’ असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मला राम दिसतो; भाजप खासदार मनोज तिवारींची मोदींवर स्तुतिसुमनं

-लातूरमधील 19 वर्षीय तरूणीच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण

-‘कमल का फूल, बडी भूल’ नारा देणारा भाजपचा मोठा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार!

-रायगडमध्ये राष्ट्रवादी संपली, शेतकरी कामगार पक्ष संपत चालला आहे!

-शिवसेनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीश्वरांकडे साकडं!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा