अपक्ष उमेदवाराला स्वत:चं मतही मिळालं नाही, ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

सहारनपूर | उत्तर प्रदेशमधील महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार घडलाय. अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला चक्क एकही मत न मिळाल्याचा प्रकार समोर आलाय.

सहारनपूरच्या वॉर्ड क्रमांक 54 मधून शबाना अपक्ष लढल्या होत्या. मात्र मतमोजणीत त्यांना शून्य मतदान झाल्याचं समोर आलं. मी माझं मत स्वत:ला दिलं होतं. तरी मला शून्य मतदान कसं? असा सवाल शबाना यांनी केलाय. तसेच आपल्याला किमान 900 मतदान झाल्याचा त्यांचा दावा आहे.

दरम्यान, मतदानावेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप करत कानपूर आणि मेरठमध्ये मतदारांनी गोंधळ घातला होता. इथं प्रत्येक मत भाजपला जात असल्याचा आरोप होता.

पाहा व्हिडिओ-