बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चार महिन्यात उत्तराखंडला मिळाले तिसरे मुख्यमंत्री, ‘हे’ असतील नवीन सीएम

डेहराडून | चार महिन्यातच उत्तराखंडला पुन्हा नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पुष्करसिंग धामी यांच्या नावाला मुख्यमंत्री पदासाठी मान्यता देण्यात आली आहे. आता उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी हे असतील.

उत्तराखंड राज्यातील विधानसभा निवडणुका आठ महिन्यांनंतर होणार आहेत. त्याअगोदर आता नवीन मुख्यमंत्री म्हणून धामी यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुष्करसिंग धामी हे खतिमाचे आमदार आहेत. राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून ते आजच शपथ घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणूनही धामी यांची ओळख आहे.

शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता तीरथसिंग रावत यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपविला होता. राजकीय खेळपट्टीवर तीरथसिंग रावत केवळ चार महिने राज्याचे मुख्यमंत्री राहू शकले आहेत. राजीनाम्याविषयी बोलताना तीरथसिंग रावत म्हणाले की, सहा महिन्यातच त्यांना विधानसभेचे सदस्य बनायचं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी केवळ आठ महिने शिल्लक आहेत.

दरम्यान, उत्तराखंड मधील भाजप आमदारांच्या झालेल्या बैठकीत तीरथसिंग रावत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पुष्करसिंग धामी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर सर्व आमदारांनी धामी यांच्या नावाला संमती दर्शवली. यामुळे आता उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी शपथ घेत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?- देवेंद्र फडणवीस

…तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता- अण्णा हजारे

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर गजाआड

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

देशांतर्गत सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापार,वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More