Viral Video | सोशल मीडियावर रिल्ससाठी लोक वेडे झाले आहेत. लोक स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी काहीही करतात. काही जण मुलांपासून मुलींचे रूप धारण करण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोकादायक गोष्टी करतात. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी रील बनवताना नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. रील्स व्हिडिओ शूट करण्याच्या नादात एका महिलेचा नदीत बुडून मृत्यू झाला असून, तिचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसतंय?
हा व्हिडिओ (Viral Video) उत्तरकाशीच्या मणिकर्णिका घाटाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळी वंशाची एक मुलगी भागीरथी नदीच्या काठावर व्हिडिओ बनवत होती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी नदीकडे जाताना व्हिडिओ बनवत आहे, नंतर ती नदीकडे थोडी पुढे जात असताना, जोरदार प्रवाहात तिचा तोल जातो आणि ती वाहून जाते.
त्याचवेळी तिच्या जवळच असलेली ११ वर्षांची मुलगी, फोनने व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना, आईला वाचवण्यासाठी जोरदार ओरडू लागते. “मम्मी, मम्मी…” जवळपास उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
मौत का ये खतरनाक वीडियो उत्तरकाशी में गंगा नदी का है..
आग और पानी से खिलवाड़ नहीं करना चाहिए.. बावजूद इसके रील बनाने के लिए लोग अपनी जिंदगी तक दांव पर लगा दे रहे हैं.. देखिए कैसे ये युवती तेज बहाव वाली नदी में उतरकर रील बना रही थी. पानी बहुत ठंडा था.. लहरों ने बैलेंस बिगाड़ा..… pic.twitter.com/2UnO47etOC— Vivek K. Tripathi (@meevkt) April 16, 2025
रिल बनवणे पडले धोक्यात
प्राथमिक माहितीनुसार, ही महिला मूळची नेपाळची आहे (Viral Video) आणि उत्तरकाशीमध्ये आपल्या नातेवाईकांशी भेटीला आली होती. तिच्या या धाडसी प्रयत्नाने आणि अनिष्ट क्षणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय.
जगभरातील सोशल मीडिया वापरकर्ते या प्रकारच्या धोकादायक स्टंटवर जोरदार टीका करत आहेत. या घटनेमुळे सुरक्षिततेच्या विषयावर एक व्यापक चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण घटनेचे विडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले असून, या प्रकारच्या घटनांपासून लोकांचे जीवन वाचवण्यासाठी सतर्कतेची सूचना देण्यात येत आहे.