बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!

लखनऊ | उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाच्या बोलेरो गाडीवर चोरांनी डल्ला मारला. एसओजी म्हणजेच पोलिसांच्या विशेष ऑपरेशन गटाच्या वाहनावर चोरांनी हात साफ केल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

एसओजी हे पथक उत्तर-प्रदेशातील पोलिसांच्या विशेष पथकांपैकी एक आहे. या पथकाला पोलिसांचा कणा म्हणुनही उत्तर प्रदेशात ओळखलं जातं.इतर पोलिसांची पथकं जेव्हा एखाद्या प्रकरणात खुलासा करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा एसओजीकडे ही प्रकरणं सोपवली जातात.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरा गाडी चोरणारे लोक आले तेव्हा त्या गाडीत नविन बदली होऊन आलेले पोलिस निरिक्षक साहेब झोपले होते.  देवरिया जिल्ह्यात नव्यानेच रूजु झालेल्या अधिकाऱ्याला चोरट्यांनी गाडीतुन उतरून दुसरीकडे झोपायला सांगितलं. झोपेत असलेल्या अधिकाऱ्यानेही त्यांच ऐकलं आणि आपल्यापैकीच एक सहकारी समजुन गाडीतुन उतरून दुसरीकडे जाऊन झोपले. काही वेळानंतर त्यांच्या पथकातील इतर लोक आल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

उत्तर-प्रदेशातील पोलिस स्टेशनचे जर असे हाल असतील तर, सामान्य जनतेच्या अडचणी पोलिस कशा सोडवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या एका महत्वाच्या पथकाची गाडी चोरून या चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणी या पावलं उचलणार आणि आपली इज्जत कशी अबाधित राखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!

पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची लस; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

पोलिसाची शेतकऱ्याला शेतात जाऊन बेदम मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

कोरोना लसीसंदर्भात गुडन्यूज, सरकारनं घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More