देश

चक्क ‘राज्यपालां’वर आमदारांनी फेकले कागदाचे बोळे; एक आमदार बेशुद्ध

लखनऊ | उत्तर प्रदेश विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी राज्यपाल राम नाईक यांचं अभिभाषण सुरु होतं. तेव्हा त्यांच्यावर कागदाचे बोळे फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.  

अभिभाषण सुरु असताना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातला. गोंधळादरम्यान सपाचे आमदार सुभाष पासी हे बेशुद्धही झाले.

राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर सपा आणि बसपाचे सगळे आमदार वेलमध्ये उतरले. बॅनर घेऊन घोषणाबाजी करत होते. वेलमध्ये नक्की काय सुरु होतं हे पाहण्यासाठी नाईक उभे राहिले तेव्हा त्यांच्यावर कागदाचे बोळे फेकले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी या प्रकाराची निंदा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ बंधूंना विक्रमाची संधी! प्रथमच एकत्र खेळणार आंतरराष्ट्रीय सामना?

लोकसभेच्या तिकीटासाठी कायपण! काँग्रेस नेता राहुल गांधींच्या पाठीमागे थेट दुबईपर्यंत

नरेंद्र मोदींचा ‘किंगमेकर’ आता शिवसेनेच्या गोटात?

-सायकलिंग स्टंटचा काळजाचा ठोका चुकविणारा व्हीडिओ नक्की बघा!

-“राजकारणातही भरपूर रेडे आहेत, पण…”, मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या