बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग मी पण म्हणायचं का शिवसेना माझी आहे?”

पुणे | गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे(Shivsena) फुटीर आमदार घेऊन बंड केले. त्यानंतर शिंदेनी भाजपसोबत(BJP) युती करून सरकार स्थापन केलं. तेव्हापासून खरी शिवसेना कोणाची हा वाद  सुरू आहे. आता हा वाद कोर्टातदेखील पोहोचला आहे. या वादासह इतर याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 22 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यावर अजून शिक्कामोर्तब झाला नाही.

आता यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयराजे भोसले(Udayraje Bhosle) यांनी खरी शिवसेना कोणाची, या वादावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झाली आहे, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेत बंड झाला याबाबत मला माहित नाही, बंड झालाय का?,असंही ते म्हणालेत. शिवसेना शिवाजी महारांजाच्या नावाने स्थापन केली आहे, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे, अरे वा मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे, असंही ते पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

लोकशाहीमुळे लोकांच्या माध्यमातून आमच्यासारखे कुठल्याही पक्षातील प्रतिनिधी मग आमदार असो किंवा खासदार असो हे निवडून येतात. त्यामुळे छत्रपतींचा महाराष्ट्र हा लोकांचा महाराष्ट्र आहे. इतर राजे आणि छत्रपतींमध्ये इतकाच फरक होता की, ते स्वत: ला राजा म्हणायचे नाही. पण जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, असं उदयराजे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘आता डबल इंजिनचं सरकार आहे, त्यामुळे…’; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

‘बंड करताना शहीद होण्याचा धोका होता’, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

“राज्य सरकार केंद्र सरकारसोबत आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचंय”

‘…असलं काही बोलून, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करू नका’; राहुल गांधी मोदींवर बरसले

कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून गुडन्यूज, इतके पैसे होणार खात्यात जमा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More