बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीसंदर्भात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात देशभरातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा सरकारचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना महत्त्वाची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना 18 ते 35 या वयोगटातील तरुण मंडळी सर्वात जास्त कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे 35 वर्षांच्या खालील वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून केली आहे.

याबरोबरच जितेंद्र आव्हाडांनी एका पत्रकार मित्राचं कोरोनामुळे निधन झालं, त्यामुळे संकटाला सामोरे जाऊन समाजाला जागृत ठेवणाऱ्या पत्रकारांनाही कोरोना लस देण्याची मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक पाठिंबा दिल्याचं व त्याची घोषणा करण्याची ग्वाही त्यांनी फोनवरून दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

18 ते 35 या वयोगटातील तरुण पिढीलाही आता लवकरच कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच पहिल्या क्रमांकावर असून लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. तसेच नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्राने लसीकरणात नुकतीच राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली आहे. लसीकरणाचा वेग असाच राहिल्यास दिवसाला  6 लाखांहून अधिक लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट सरकारला गाठता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

50 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतणार 82 वर्षांच्या चौकीदाराची प्रेयसी

“एक कोरोनाचा रुग्ण सापडला तर आजूबाजूची 20 घरं करणार सील”

AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला

‘या’ कारणाने नवऱ्यानेच तिचा अश्लिल व्हिडीओ काढुन केला सोशल मिडियावर व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या नियमांना शिवसैनिकाकडुनच केराची टोपली; झाली ‘ही’ कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More