वॉशिंग्टन | अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात एका आरोग्य सेविकेला लस देऊन करण्यात आली आहे. लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तसेच जगातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतातही Pfizer-BioNtech या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे.
भारतात एकूण आठ लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु असल्याचं समजतंय. जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
First Vaccine Administered. Congratulations USA! Congratulations WORLD!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 14, 2020
थोडक्यात बातम्या-
अधिवेशन आणि कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नको आहेत- नारायण राणे
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार- अण्णा हजारे
‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’; हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र
“काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचं त्यामागे अहमदभाई आहेत”
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं पाणी बील थकीत नाही; मुंबई महापालिकेचा अहवाल