बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ मंदिरात दर्शनासाठी लागणार लसीकरण प्रमाणपत्र!

भोपाळ | कोरोनाचा कहर हळुहळु कमी होताना दिसत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करणं गरजेचं बनलं आहे. अशातच आता मध्य प्रदेशमध्ये असं एक मंदिर आहे, जिथे मंदिरात प्रवेश करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र गरजेचं आहे.

मध्यप्रदेशमधील इंदूरचे प्रसिद्ध खजराना गणेश मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात कोरोनाकाळात दर्शनासाठी प्रवेश करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र सोबत न्यावं लागणार आहे.

मंदिराचे पुजारी अशोक भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात दाखल होणाऱ्या भाविकांची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. प्रशासनाद्वारे मंदिर परिसरातच लसीकरण केंद्रही सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे, दर्शनासाठी येणारे भाविक लस घेऊन तात्काळ प्रमाणपत्रही मिळवू शकतात.

थोडक्यात बातम्या – 

‘जयललिता’ नंतर आता ‘इंदिरा गांधी’च्या भूमिकेत झळकणार कंगना रणौत

‘या’ जिल्ह्यातील 30 कोविड सेंटर बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; आरोग्य कर्मचारी बेरोजगार

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल- चंद्रकांत पाटील

कसोटी विश्वचषकात ‘या’ भारतीय गोलंदाजाने मिळवले सर्वाधिक बळी, फलंदाजीत टॉप 3 मध्ये एकही भारतीय नाही

“तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More