Top News देश

कोरोना लसीकरणाची मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार!

नवी दिल्ली | कोरोना लसीकरणाला 16 जानेवारी पासून संपूर्ण देशभरात सुरु होणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.

मंगळवारी  सीरम इन्स्टिट्यूटनं पुण्याहून देशातील विविध ठिकाणांना कोरोना लसीचा पुरवठा सुरु केला आहे.  सध्या केंद्र सरकारकडं कोरोना लसीच्या ५४.७२ लाख डोसचा साठाअसून, गुरुवारपर्यंत या डोसची संख्या १.६५ कोटीपर्यंत जाईल, अशी माहिती आहे.

त्यातील १ कोटी १० लाख डोस सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’चे तर ५५ लाख डोस भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीचे असणार आहेत. तसंच चाचणीच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्यसेवक व कोरोना योद्धा यांच्यासह ३ कोटी लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, कोवॅक्सिन, कोविशिल्डप्रमाणेच देशात आणखी काही कोरोना लसींवर संशोधन सुरु आहे. त्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आल्यानंतर केंद्र सरकार त्या लसींबाबत काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या