बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात फक्त ‘या’ वयोगटालाच लसीकरण, आजच निर्णय होण्याची शक्यता

मुंबई | राज्यात जोपर्यंच मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत 18 ते 45 वयोगटातील सर्वांना सर्रास लस देणं शक्य नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

35 ते 44 या वयोगटातील लोकांना आणि विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना प्राधान्यानं लस देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली जात आहे. 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी केवळ 7 लाख 79 हजारच लसी उपलब्ध झाल्यानं लसीकरण संथ गतीनं सुरू असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

45 वर्षावरील लोकांसाठी 9 लाख व्हॅक्सिन मिळाल्या. त्याचं वाटप झालं आणि 8 लाख लसींचा वापरही झाला. आता काही हजारच लसी 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी शिल्लक आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच केंद्राला वारंवार पत्र लिहित आहोत. केंद्रानं दबाबदारी घेतलेल्या 45 वर्षावरील व्यक्तींसाठी तरी लस उपलब्ध करुन द्या, अशी मागणी राजेश टोपे यांनी केलीये.

लहान वयोगटातील मुलांच्या अनुषंगाने लागणारे बेड्स, व्हेंटिलेटर तसंच वेगळ्या टाईपचे बेड तयार केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी रात्री दहा वाजता याबाबत चर्चा केली आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“विखेंच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका, ते नैराश्यात आहेत”

“अजितदादा धडाडीचे नेते, उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?”

‘छोटा राजन जिवंत आहे’; AIIMS च्या अधिकाऱ्यांचा खुलासा

8 महिन्याच्या चिमुकल्याला यकृतदान करून आईनं दिला दुसरा जन्म!

पुण्यातील लॉकडाउनबाब अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More