बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझं शरीर एक मंदिर, त्यात मला कुठलंही रसायन टाकायचं नाही”

नवी दिल्ली | कोरोना लसीकरण देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सगळ्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण व्हावं म्हणून सरकारकडून आवाहन केलं जात आहे. मात्र अजूनही काही लोक लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसतात. अशातच आणखी एक नाव या यादीत समाविष्ट झालं आहे. शेरशाह फेम अभिनेता बिजय आनंद यानं लस न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुस्थान डाॅट काॅमनं दिलेल्या वृत्तानुसार, लसीकरण हा खूप मोठा घोटाळा असून, हा सर्व राजकीय खेळ असल्याचा आरोप अभिनेता बिजय आनंद यानं केला आहे. म्हणून त्यानं लसीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता बिजय आनंद यांच्या मते, माझं शरीर एक मंदिर असून त्यामध्ये मला कुठलंही रसायन टाकायचं नाही. लसीकरण न केल्यामुळे मला अनेक चित्रपट, वेबसिरिजला मुकावं लागलं आहे. अनेक समारंभातही जाता आलं नाही. मात्र तरीही मी लस घेणार नाही, असं स्पष्ट मत बिजय आनंद यानी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, अभिनेता बिजय आनंद यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांनी कलासृष्टीत स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ते अभिनेत्यासोबत एक योग शिक्षकही आहे. लस न घेण्याच्या निर्णयामुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

FD धारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 3 बॅंकांनी बदलले एफडीचे व्याजदर

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभिर्याने घेत नाही’; पाटलांच्या टीकेवर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

…अन् रिमझिम पावसामुळे इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

“शरद पवार आमचे नेते नाहीत, आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठीची तडजोड”

‘भविष्यातही कोरोना महामारीपासून सुटका नाहीच’; गगनदीप कांग यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More