बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं घरीच होणार लसीकरण; मोहीम राबवण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या

सोलापूर | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. 1 मे पासून अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. परंतु, महाराष्ट्रात मात्र काही दिवस लसीकरण सुरू राहिलं आणि त्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आलं.

दरम्यान, लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी 45 वर्षांच्या पुढील वयोगटातील सर्व नागरिकांचं लसीकरण घरीच होणार असल्याची माहिती दिली आहे.

सोलापूर शहरातील 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचं लसीकरण हे लसीकरण केंद्रात न करता त्यांची नाव शोधून घरापर्यंत जाऊन ऑनलाइन नोंदणी करून लस देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पी. शिवशंकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना लसीकरण केंद्रात जाण्याची गरज नाही.

सोलापूर शहरात राबवण्यात येणार असलेल्या या मोहिमेसाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करणार असल्याचंही पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आता शिक्षकांना या कामासाठी नियुक्ती देण्यात येणार असून आधीच कोरोनाड्युटीमुळे नाराज असलेला शिक्षकवर्ग यावर नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तींसाठी नियमात बदल

“एकीकडे राज्याने कोकणाला 252 कोटींची मदत केली, पण केंद्राची कमिटी आली अन् जेवणावर ताव मारला”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा

केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू, अन्यथा…

थट्टा नशिबानं लावली! वीज पडून 350 क्विंटल कांद्याचा झाला कोळसा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More