मुंबई | कोरोना विषाणूमुळे सगळीकडे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटनं धुमाकूळ घालत धोका वाढवला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लवकरात लवकर लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. अशातच आता लसींचा तुटवडा पडल्यानं आज मुंबईतील लसीकरण बंद राहणार आहे.
मुंबईत लसीकरण केलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी सध्या झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. मात्र एकीकडे लसीकरणासाठी लाईन लागली असताना दुसरीकडे लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आज मुंबईतील लसीकरण बंद राहणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबत माहिती देत सांगितलं की, लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबईतील सरकारी तसंच महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही मुंबईकरांना करण्यात आलं आहे.
दरम्यान, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तेव्हाच आपण हा लढा लढू शकतो.
थोडक्यात बातम्या –
कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर
…म्हणून पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने गावात वाटले चक्क कंडोम!
“महाराष्ट्रातील पेटत्या मशालींचे चटके दिल्लीस बसताच 127 व्या घटनादुरुतीचं पाऊल पडलं”
धोकादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत पहिला बळी
‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ
Comments are closed.