बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

नवी दिल्ली | कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. लसीकरण हे एकमेव शस्त्र या महामारीला आटोक्यात आणू शकतं. त्यामुळे लसीकरण मोहिमा देशभर राबवल्या जात आहे. त्यामुळे आता देशात लसीकरणाला वेग आला आहे. अशातच आता भारत बाकीच्या देशांना लस पुरवणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात भारतात लसीकरणाला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. त्याचबरोबर लसींच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे. यातच आता भारताला लसीकरणात वेग आला असून पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना लसी पुरवायला सुरुवात करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

‘व्हॅक्सिन मैत्री’ या संकल्पनेनुसार भारत बाकीच्या देशांना कोरोना लसींचा पुरवठा करणार आहे. भारतात लसींच्या उत्पादनात वाढ झाली असून बायोलॉजिकल-ई कंपनीच्या लसीदेखील आता बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता ज्या देशांना लस कमी पडेल, ज्या गरजू, गरिब देशांना लस मिळणं शक्य होणार नाही, अशा देशांना भारताकडून लस पुरवठा केला जाईल, असं मनसुख मांडविया यांनी म्हटलं.

दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सतर्क राहण्याची गरज आहे. लसीकरण करुन तिसऱ्या लाटेला थोबवण्यात येऊ शकते, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत”

राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अलर्ट जारी

चांगलं केलं की चांगलंच होतं, आता वेळच सर्व गोष्टींना उत्तर देईन – सोनू सूद

विराटची लाडकी कार विक्रीसाठी बाजारात, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

उदय सामंत म्हणजे कोकणातले शक्ती कपूर – नितेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More