बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतासाठी दिलासायक बातमी! Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी

नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिअंटमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. ऑमिक्रॉन नावाच्या या व्हॅरिअंटचा पहिला रुग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपले लॉकडाऊन वाढवून निर्बंध कडक केेले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या लसी ऑमीक्रॉनसाठी देखील प्रभावी ठरणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भारत बायोटेकच्या लसीबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

भारत बायोेटेकची कोव्हॅक्सिन लस ऑमिक्रॉन विरूद्ध प्रभावी ठरु शकते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. उपलब्ध असलेल्या इतर लसींच्या तुलनेत कोव्हॅक्सिन अधिक परिणामकारक असल्याची माहिती एका निनावी अधिकाऱ्यानं दिली आहे. एक निष्क्रिय लस संपूर्ण व्हायरस कव्हर करते आणि या बदललेल्या व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते, असं अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

आणखी एका निनावी आयसीएमआर अधिकाऱ्यानं कोव्हॅक्सिन ही अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा यांसारख्या प्रकारांवर देखील प्रभावी ठरू शकत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाच्या या नवीन व्हॅरिअंटला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं होत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानंतर हे नाव बदलून ऑमिक्रॉन करण्यात आलं.

कोरोनाच्या नवीन व्हॅरिअंटबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याने यावर आता लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी या व्हॅरिअंटला ‘व्हॅरिअंट ऑफ कन्सर्न’ या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. कोरोनाच्या व्हॅरिअंटमध्ये वेगाने बदल होणं ही चिंतेची बाब असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं एका निवेदनात म्हटलं आहे. ओमिक्रॉनमध्ये आधीच्या व्हॅरिअंटपेक्षा जास्त उत्परिवर्तन दिसून येत असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना झटका, मोजावे लागणार इतके रूपये

…त्यातून नागपूरने 325 कोटी कमवले, काहीच टाकाऊ नसतं-नितीन गडकरी

मोठी बातमी! माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं अखेर निलंबन

ओमिक्रॉनची धास्ती; बुस्टर डोस घ्यायचा की नाही?; नीति आयोगाने दिली ‘ही’ माहिती

तेलंगणातून चिंता वाढवणारी बातमी समोर, तब्बल ‘इतके’ विद्यार्थी सापडले पॉझिटीव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More