बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता ‘या’ लसीची निर्मिती भारतात होणार ; DGCI कडून अधिकृत मान्यता

मुंबई | कोरोनाचा वाढणारा धोका पाहता लवकर देशभरात लसीकरण करण्याची गरज आहे. भारतात फक्त कोवाॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसीच्या वितरणाला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रशियाच्या स्पुटनिक वी या लसीच्या वितरणासाठी परवानगी देण्यात आली होती. आता मात्र स्पुटनिक वी लस भारतातच तयार होणार असल्यानं भारतीयांची चिंता दूर झाली आहे.

स्पुटनिक-वी लसीची भारतात निर्मिती करणारी पॅनेशिया ही पहिली कंपनी ठरणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या स्पुटनिक-वी लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे. रशियानं कोरोना लसीबाबत सहा कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यात पॅनेशिया बायोटेक कंपनीचा देखील समावेश होता.

देशात स्पुटनिक वी लसीचे भारतातील वितरण हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत होती. या लसीचा एक डोस 1142 रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होती. पण आता  भारतात लस तयार होणार असल्यानं लसीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या लसीची निर्मिती भारतात केली जाणार आहे.

दरम्यान, रशियानं तयार केलेल्या स्पुटनिक लसीचे दोन डोस घेण्यामधील अंतर हे 21 दिवसांचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस 21 दिवसानंतर घ्यावा लागतो. स्पुटनिक वी लसीच्या एका डोसची किंमत 1142 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. स्पुटनिक वी लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…मग तुमची झोप का उडाली?’; राष्ट्रवादीची शिवसेनेवर खोचक टीका

भारतीय खेळाडूची ऐतिहासिक खेळी; टी-20 मध्ये ठोकलं धुवाधार द्विशतक

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

“विरोधकांनी महाराष्ट्रातील उत्तम कामगिरीबद्दल ठाकरे सरकारचे आभारच मानायला हवेत”

पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोडली ‘ही’ परंपरा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More