बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितलं जात आहे. अशातच मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचं लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याबाबत सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांना सप्टेंबर महिन्यापासून लस देण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून मुलांचं लसीकरण सुरु होईल, असं एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.

दरम्यान, 2 ते 3 महिन्यांच्या फॉलोअप आल्याने सप्टेंबरपर्यंच डेटा हाती येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत लसीला मंजुरी मिळेल अशी आशा आहे. असं झाल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध असेल, असं गुलेरिया यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी- नाना पटोले

नवविवाहित जोडप्यावर काळाचा घाला, अपघातात वधूवरासह सहा जणांचा मृत्यू

कोकण, पश्चिम महाराष्ट्रामधील मृत्युतांडव, अश्रूतांडव शब्दापलीकडचं- तुकाराम मुंढे

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More