बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानं राज्य सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. दररोज ४ लाखांहून अधिक जणांना लसीकरण केलं जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी लसीकरण जास्त उपायकारक असून ठाकरे सरकारने त्याला गती दिली आहे. यातच राज्यात लवकरच लसीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे लसीची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. लसीकरणाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनाने मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर टोपे यांनी भर दिला. याआधी राज्यात 25 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली होती.

दरम्यान, राज्यातील लस वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. राज्यात सध्याचा लसींचा साठा लक्षात घेत केंद्र शासनाकडून तातडीने मागणीप्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. कोवॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा, असं टोपे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बाातम्या-

“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”

“…तर 2-4 आठवड्यांतच कोरोना रूग्ण कमी होतील”

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

लेखक राज ठाकरेंना म्हणाले, जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट, रूपाली पाटील म्हणाल्या, ‘तुला सोडणार नाही…’

पंजाने धनुष्यबाणाशी जुळवून घेतलं, घड्याळाचं टायमिंग चुकलं, कमळाचं गणित हुकलं!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More