बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात वडेट्टीवारांच्या खात्याचा हात पण मंत्री म्हणतात, मला विचारलंच नाही!

मुंबई | महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुन्हा पुढे ढकलण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयावरून सरकारला धारेवर धरलं जात आहे मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं होतं त्यामध्ये विजय वडेट्टीवारांच्या खात्याने परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पर्व परीक्षा 2020च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च, 2021 रोजीच्या पत्राद्वारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आलं आहे, असं पत्रकात म्हटलं आहे. मात्र यावर विजय वडेट्टीवारांनी मला याबाबत विचारलं नसल्याचं म्हटलं आहे.

माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यात आली हे समजल्यावर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर  उतरून आंदोलन केलं आणि सरकारचा निषेध केला. मात्र आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

विजय वडेट्टीवर यांच्या खात्यानं दिला MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा सल्ला!

विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे- देेवेंद्र फडणवीस

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घ्या”

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More