Vadgaon Sheri l विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. कारण अजित पवार गटाने वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.
अजित पवारांनी बडा नेता उतरवला मैदानात :
राष्ट्रवादी अजित पवार गटाने वडगाव शेरी मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील टिंगरे याना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील प्रचंड आग्रही होते. मात्र त्यांची उमेदवारी वगळून सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अशातच आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. मात्र आता जगदीश मुळीक नेमकी काय भीमक घेणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
Vadgaon Sheri l जगदीश मुळीक काय भूमिका घेणार? :
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जगदीश मुळीक यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता मात्र त्यांना डावलून सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे.
याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देखील दिला आहे. त्यामुळे आता जगदीश मुळीक नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
News Title : Vadgaon Sheri Vidhansabha 2024
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंकडे एकूण संपत्ती किती?, आकडा ऐकून थक्क व्हाल
मोठी बातमी! अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?, मोठी माहिती समोर
कॉँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, 48 नावांची झाली घोषणा!